पाहा ट्रेलर : दबंग सैफचा `बुलेट राजा`, TRAILER LAUNCH : BULLETT RAJA

पाहा ट्रेलर : दबंग सैफचा `बुलेट राजा`

पाहा ट्रेलर : दबंग सैफचा `बुलेट राजा`

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

‘साहेब, बीबी और गँगस्टर’ सारखे सिनेमे बनवणाऱ्या तिग्मांशु धुलिया याचा आगामी सिनेमा ‘बुलट राजा’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय.

सैफ अली खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. एका दबंग रुपात सैफ या सिनेमात दिसतोय. सैफ अली खाननं ‘बुलेट राजा’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या एक दबंग मवाल्याची भूमिका निभावलीय. हाच गुंडा इतरांना मदतही करतो. आणि ओघानंच या गुंड्याची ‘लेडी-लव्ह’ म्हणजेच प्रेयसीची भूमिका निभावताना दिसते सोनाक्षी सिन्हा... नेहमीप्रमाणेच सोनाक्षी या सिनेमातही आपल्या देसी लूकमध्ये साडी आणि सलवार-कुर्त्यात पाहायला मिळते.

अॅक्शन आणि रोमांसचा तडकाही या सिनेमात आहे. सिनेमाचं बहुतेक शूट कोलकातामध्ये पार पडलंय. येत्या २९ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

व्हिडिओ पाहा -


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 08:15


comments powered by Disqus