Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडमध्ये सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’च्या ट्रेलरची जोरदार आणि खमंग चर्चा सुरू आहे. नुकताच भन्साळी यांच्या आगामी ‘रामलीला’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.
बॉलिवूड महानायक बीग बी अमिताभ बच्चन यांनीही संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’चा ट्रेलर पाहिलाय. हा सिनेमा उत्तम असेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.
हा ट्रेलर यू ट्यूबवरही चांगलाच गाजतोय. अमिताभ यांच्याकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळाल्यानं दीपिकाही भलतीच खूश झालीय. तिनं यासाठी बीग बीला धन्यवादही दिलेत.
या सिनेमात रणबीर आणि दीपिकाचे ढासू संवाद आणि बोल्ड सीन्स भरपूर प्रमाणात पाहायला मिळणार आहेत. दीपिका रणबीरला एका सीनमध्ये म्हणते, ‘फिगर पे मत जा वरना ट्रिगर दबा दूंगी’... आणि हाच आता कॉलेज कट्यावरही ऐकायला मिळतोय.
‘रामलीला’ या सिनेमात रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांच्या मुख्य भूमिका आहेत. शेक्सपिअरचं गाजलेलं नाटक ‘रोमिओ ज्युलिएट’वर या सिनेमाचं कथानक आधारीत आहे. १५ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून देईल, असं अनेकांचं म्हणणं आहे.
व्हिडिओ पाहा : •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, September 19, 2013, 09:33