ट्रेलर : ‘सिटीलाईटस्’मध्ये हरवलेला राजकुमार!, trailer : national award winner rajkummar rao in ‘city

ट्रेलर : ‘सिटीलाईटस्’मध्ये हरवलेला राजकुमार!

<B> <font color=red> ट्रेलर : </font></b> ‘सिटीलाईटस्’मध्ये हरवलेला राजकुमार!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘शाहिद’ चित्रपटात शानदार अभिनय करून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या राजकुमार राव आता पुन्हा एकदा ‘सिटीलाईटस्’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतोय.

‘सिटीलाईटस्’ या सिनेमातून दिग्दर्शक हंसल मेहता आणि अभिनेता राजकुमार राव या जोडीची कमाल पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्थलांतरितांच्या मुद्यावर या सिनेमाची कथा आधारित आहे. एका विवाहीत जोडप्याच्या भोवताली या सिनेमाची कथा फिरत राहते.

चांगलं आयुष्य, सुखाची नोकरी आणि दोन घासाच्या शोधासाठी हे जोडपं राजस्थानहून भुलभुलैय्या मुंबईत दाखल होतं. पण, नोकरी आणि पैसे मिळत नाहीत तेव्हा पत्नीवर बारबाला बनण्याची वेळ येते, असं काहीसं सिनेमाचं कथानक... ब्रिटीश सिनेमा ‘मेट्रो मनीला’ याचा रिमेक असलेला हा सिनेमा येत्या 30 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.


राजकुमार राव आणि हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईटस्’चा ट्रेलर पाहण्यासाठी :



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 2, 2014, 19:23


comments powered by Disqus