व्हिडिओ : `पोश्टर बॉईज`चा धम्माल ट्रेलर, trailer : poshter boys, marathi movie

व्हिडिओ :`पोश्टर बॉईज`चा धम्माल ट्रेलर

<B> <font color=red>व्हिडिओ :</font></b>`पोश्टर बॉईज`चा धम्माल ट्रेलर

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

समीर पाटील दिग्दर्शित पोश्टर बॉईज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल वेबसाईट यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय.

ही कहाणी आहे तीन पुरुषांची... शासनाच्या नसबंदीसाठी आवाहन करणाऱ्या एका पोस्टरवर या तिघांचा फोटो छापला जातो... आणि त्यामुळे जो काही गोंधळ निर्माण होतो... त्याचाच हा हास्यकल्लोळ...

या चित्रपटात बऱ्याच दिवसानंतर दिलीप प्रभावळकर मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या लोकप्रिय मालिकेतले ‘आबा’ आता आपल्याला चक्क ‘सिक्स पॅक्ज अॅब्ज’मध्ये दिसणार आहेत. इतकंच नाही, तर ते एका गाण्यावर ठेका धरतानाही आपल्याला दिसतील.

दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत या चित्रपटात हृषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत आणि पल्लवी सुभाष यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.


व्हिडिओ पाहा -





* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 15, 2014, 15:53


comments powered by Disqus