भूतासोबत दोनदा सेक्स केल्याचा अभिनेत्रीचा दावा, ukrainian born actress claims she has twice had sex

भूतासोबत दोनदा सेक्स केल्याचा अभिनेत्रीचा दावा

भूतासोबत दोनदा सेक्स केल्याचा अभिनेत्रीचा दावा

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भूतासोबत सेक्स? थोडं विचित्र वाटतंय ना... पण, हाच दावा केलाय यूक्रेनच्या एका अभिनेत्रीनं... आपण भूतासोबत एकदा नाही तर दोन वेळा सेक्स केलाय... आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मजेशीर होता, असं या अभिनेत्रीचं म्हणणं आहे.

नताशा ब्लासिक असं या अभिनेत्रीचं नाव आहे. यूके टीव्ही शो दरम्यान तिनं हा खुलासा केलाय. नताशाचा पती जेव्हा घरात नव्हता तेव्हा तिला जाणवलं की तिच्या शरीराला कुणीतरी स्पर्श करतंय... परंतु, यावेळेस घरात मात्र कुणीही नव्हतं, असं नताशा म्हणतेय. मला हे जाणवत होतं की कुणीतरी माझ्या शरीराला स्पर्श करतंय. त्या न दिसणाऱ्या व्यक्तीचं वजनही मला माझ्या शरीरावर जाणवत होतं. पण, मला यावेळी कुणीही दिसलं नाही. पहिल्यांदा मला काहीच समजलं नाही... मी सैरभैर झाले... पण, मग मी थोडं शांत होण्याचा निर्णय घेतला... आणि मग मीही या अनुभवाचा आनंद घेतला.

न्यूयॉर्क डेली न्यूज रिपोर्टनुसार, यानंतर ते भूत तिथून निघून गेलं. पण एका महिन्यानंतर या भूताचा अनुभव मला पुन्हा एकदा आला. मला पुन्हा एकदा तोच अनुभव आला... परंतु, हा अनुभव पहिल्या अनुभवापेक्षा चांगला होता, असं ब्लासिकनं म्हटलंय.

‘हे सगळं गंमतशीर होतं... मी जेव्हा लहान होते तेव्हा वाटत होतं की या जगात आणखीही काही असावं ज्याला जाणून घेण्याची माझी इच्छा होती... मी नेहमी प्रश्न विचारत राहायचे... पण, या घटनेनं हे सिद्ध केलंय की जगात असंही काही आहे जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही’ असंदेखील ब्लासिकनं म्हटलंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 3, 2014, 19:32


comments powered by Disqus