गायक सोनू निगमला अंडरवर्ल्ड शकीलकडून धमकी, Underworld don Chhota Shakeel threat singer Sonu Nigam

गायक सोनू निगमला अंडरवर्ल्ड शकीलकडून धमकी

गायक सोनू निगमला अंडरवर्ल्ड शकीलकडून धमकी
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

प्रसिद्ध गायक सोनू निगम याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलने धमकी दिल्याचे पुढे आले. याप्रकरणी सोनूच्यावतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी असलेला करार मोडावा अन्यथा समाजात बदनामी करण्याची धमकी छोटा शकीलने फोनद्वारे दिली आहे.

दाऊद इब्राहीम गँगचा सदस्य छोटा शकील याच्याकडून त्याला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. या प्रकरणी सोनू निगमने मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. सोनू निगम सध्या परदेशात आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी असलेला करार रद्द करुन दुबईतल्या अल्ताफ नावाच्या व्यक्तीच्या कंपनीशीच करार करावा, अन्यथा रेकॉर्ड केलेले विशिष्ट फोन कॉल जाहीर करून बदनामी करू; अशा स्वरुपाची धमकी सोनू निगमला येत आहे. सोनू निगम ऐकत नाही आणि फोन घेणे टाळत आहे हे पाहून छोटा शकीलकडून धमकीचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 11:21


comments powered by Disqus