Last Updated: Tuesday, November 19, 2013, 15:32
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधून झळकणारी पाकिस्तानी मॉडेल वीणा मलिक अनेकदा आपल्या हॉट अदांसाठी चर्चेत येते. पण, सध्या चर्चा सुरू आहे ती वीणा मलिकच्या डेटिंगची... वीणा लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे आणि तेही एका बिझनेसमनसोबत...
उद्योगपती उमर फारुखसोबत वीणा लग्न करतेय. काही दिवसांपूर्वी वीणा मुंबई एअरपोर्टवर उमरबरोबर दिसली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची भेट २०१३ मध्ये दुबईत झाली होती. त्यानंतर उमरने वीणाला प्रपोज केलं. हे दोघं २०१५ पर्यंत लग्न करणार अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
एका आठवड्यापूर्वी वीणाला आपल्या फ्रेंडसोबत दुबईमध्ये डिनर करताना पाहिलं गेलं होतं. याचे काही फोटोही लीक झाले होते... त्यानंतर वीणाने स्वत:हून आपल्याला २०१५ पर्यंत लग्नाच्या बेडीत अडकण्याची इच्छा असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. त्यानंतर आता वीणा लवकरच लग्नाची तारीख जाहीर करून गोड बातमी आपल्या चाहत्यांना देणार, असं दिसतंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 19, 2013, 15:31