Last Updated: Friday, April 11, 2014, 17:48
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई संगीतकार नंदू भेंडे यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते 61 वर्षांते होते. त्यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुलगे आणि वडील असा परिवार आहे.
भेंडे हे सांताक्रूझ येथे राहत होते. सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले होते. याची माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली. परंतु त्यांच्यावर उपचार होण्यापूर्वीच निधन झाले.
1970 च्या दशकात मराठी चित्रपटांमध्ये आधुनिक प्रकारचे संगीत भेंडे यांनी आणले. `डिस्को वावटळ` या नावाचा अल्बम 1980 मध्ये गाजला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 11, 2014, 16:34