`घनचक्कर`मध्ये इम्रान हाश्मीसोबत विद्याचा जलवा, vidya balan with imran hashmi in Ghanchakkar

`घनचक्कर`मध्ये इम्रान हाश्मीसोबत विद्याचा जलवा

`घनचक्कर`मध्ये इम्रान हाश्मीसोबत विद्याचा जलवा
www.24taas.com, मुंबई

ऊ.. ला ऊ ला... म्हणत विद्या बालन पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये थिरकताना दिसणार आहे. नुकतीच नवी नवरी झालेली विद्या बालनचं म्हणणं आहे की, तिच्या लग्न करण्याने तिच्या कामावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. विद्या बालनने कॉमेडी सिनेमा `घनचक्कर`मध्ये इम्रान हाश्मीसोबत दिसणार आहे.

`इश्किया` आणि `डर्टी पिक्चर`मध्ये विद्याने एका बोल्ड अभिनेत्रीचा अभिनय करीत साऱ्यांनाच घायाळ केले होते. आणि याच सिनेमाने तिला अनेक पुरस्कारही मिळवून दिले. लग्नानंतर विद्या बोल्ड भुमिका करणार का? असं तिला विचारले असता, विद्याने सांगितले की, मी एक अभिनेत्री आहे. आणि मी माझं लग्न झालं आहे, ह्या दोन गोष्टी मात्र वेगळ्या आहेत. मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही एकमेकांच्या कामाबाबत फारच आदर करतो.

घनचक्कर या कॉमेडी सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार गुप्ता हे करतात. आणि हा सिनेमा २१ जूनला प्रदर्शित होणार आहे. लग्नानंतर विद्याचा हा पहिला सिनेमा असणार आहे. तिने म्हटंले की, हा सिनेमा माझ्यासाठी फारच खास असणार आहे. कारण की, हा माझ्या लग्नानंतर प्रदर्शित होणार आहे. इम्रानसोबत काम करण्याचा अनुभव हा फारच चांगला होता. ३५ वर्षीय अभिनेत्रीने या सिनेमात एका पंजाबी गृहिणीची भुमिका केलेली आहे.

First Published: Wednesday, January 23, 2013, 13:48


comments powered by Disqus