`विश्वरूपम`ची कमाईही १०० कोटींच्या पुढे Vishwaroopam in 100 crores club

`विश्वरूपम`ची कमाईही १०० कोटींच्या पुढे

`विश्वरूपम`ची कमाईही १०० कोटींच्या पुढे
www.24taas.com, मुंबई

निर्माता, दिग्दर्शक आणि आभिनेता कमल हसन याचा विश्वरुपम हा सिनेमाही यशाच्या शिखरावर पोहचला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात आडकला होता. तरी सुद्धा फक्त चार दिवसातच १०० कोटी ची कमाई केली आहे. बॉक्स ऑफीसवर हा सिनेमा धमाल करत आहे.

या एक्शन-थ्रिलर सिनेमात आभिनेता राहुल बोसने आल-कायदा या संघटनेतसाठी कामकरणाऱ्या दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. त्यानेच या सिनेमाच्या यशावर खुश होऊन ट्विटरवर यासंदर्भात ट्विट केलं आहे. विश्वरूपमही १०० कोटीच्या क्लब मध्ये सामिल झाल्याची माहीती राहुलने आपल्या या ट्विटमध्ये दिली आहे.
४५ वर्षीय राहूल बोसने ट्विट केलं आहे, की ‘विश्वरुपम’ हा सिनेमा माझ्यासाठी खास आहे. आत्ता पर्यंत या सिनेमाने १२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये काम करण्याचा अनुभव खुप छान होता. मुख्य म्हणजे कमल हसनसारख्या कलाकारासोबत काम करायची संधी आपल्याला मिळाली, हे आपलं सौभाग्य असल्याचं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्याने कमल हसनला या सिनेमाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

First Published: Monday, February 11, 2013, 17:28


comments powered by Disqus