तामिळनाडूत `विश्‍वरूपम`वरील बंदी हटविली, `Vishwaroopam` to release in TN

तामिळनाडूत `विश्‍वरूपम`वरील बंदी हटविली

तामिळनाडूत `विश्‍वरूपम`वरील बंदी हटविली
www.24taas.com,चेन्नई

प्रसिद्ध अभिनेता कमल हसन याचा विश्‍वरूपम हा चित्रपट आज (रविवार) अखेर तमिळनाडूमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कथित वादग्रस्त दृश्‍ये काढून टाकण्याची तयारी दाखविल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी विश्वरूपमवरील बंदी आज हटविली.

ही बंदी हटविल्याने तमिळनाडूत या चित्रपटाच्या निमित्ताने सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. विश्‍वरूपम हा सिनेमा प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने तमिळनाडूचे गृह सचिव आर. राजेंद्रन, अभिनेता कमल हसन आणि २४ मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये शनिवारी सचिवालयात सुमारे साडेचार तास चर्चा झाली होती. यात चर्चेच्या दोन फेऱ्या होऊन तोडगा काढण्यात आला.

चर्चेनंतर कमल हसन याने मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावणारी कथित सात दृश्‍ये काढून टाकण्याची तयारी दर्शविली होती. त्यापूर्वी तमिळनाडूत विश्‍वरूपमच्या प्रदर्शनावर मद्रास उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची बंदी घातली होती. त्यामुळे कमल हसनने देश सोडण्याची धमकीही दिली होती.

First Published: Sunday, February 3, 2013, 18:18


comments powered by Disqus