अभिनेता विवेक ओबरॉय झाला बाबा, Vivek Oberoi, wife blessed with son

अभिनेता विवेक ओबरॉय झाला बाबा

अभिनेता विवेक ओबरॉय झाला बाबा
www.24taas.com,मुंबई

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरॉय बाबा झाला आहे. त्याची पत्नी प्रियांका हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बाबा झाल्याची बातमी खुद्द विवेकने ट्विटवर दिली.

आपल्या चाहत्यांना ही गोड आनंदाची बातमी देताना विवेकने ट्विट केलंय, आज माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे. मी खूप आनंदी आहे. मी आणि प्रियांकाने आमच्या लिटिल एंजलचे या जगात स्वागत केले आहे.

तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. आज माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस असून मी खूप आनंदी आहे, असे विवेकने ट्विट केलेय. विवेक आणि प्रियांकाला झी २४ तासकडून शुभेच्छा.

विवेक, अभिनेता सुरेश ओबेराय यांचा मुलगा आहे. विवेकने २०१० मध्ये लग्न केले. कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी प्रियांका अल्वा हिच्याशी लग्न केलं.

विवेक आणि प्रियांकाला अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हिने शुभेच्छा दिल्यात. मला माहित आहे की आपल्या जीवनातील आजचा दिवस खास आहे. तर जेनेलिया पती रितेश देशमुखनेही ट्विट करताना अभिनंदन, भाई असं म्हटलंय. प्रियांका आणि तिच्या परिवाराला खूप शुभेछ्या.

First Published: Wednesday, February 6, 2013, 20:43


comments powered by Disqus