Last Updated: Tuesday, August 28, 2012, 15:45
www.24taas.com, मुंबई‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’, ‘इशकजादे’ या दोन सिनेमांमधून लोकांची लाडकी बनलेल्या परिणीती चोप्राला नुकत्याच एका लाजिरवाण्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. `शिरीन फरहाद की तो निकल पडी` च्या खास शोच्या वेळी तिचं वॉर्डरोब मालफंक्शन घडलं.
गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या `शिरीन फरहाद की तो निकल पडी` या सिनेमाचा मुंबईत खास शो ठेवण्यात आला होता. या शो ला बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. परिणिती चोप्राही या शोसाठी आली होती. या वेळी परिणिती चोप्राने नारिंगी रंगाचा अत्यंत तंग स्कर्ट परिधान केला होता. हा स्कर्ट मागील बाजूस अवघड जागी फाटल्यामुळे परिणितीची चांगलीच फजिती झाली.
बॉलिवूडमधील तंग कपड्यांच्या फॅशनमुळे बऱ्याच अभिनेत्रींना आणि मॉडेल्सचं वॉर्डरोब मालफंक्शन घडतंय. करीना कपूर, प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ यांसारख्या प्रख्यात अभिनेत्रींचंही वेळोवेळी वॉर्डरोब मालफंक्शन घडलं आहे. प्रियंका चोप्राची चुलत बहीण असणाऱ्या परिणिती चोप्राचंही या यादीत नाव आलं आहे. काही वेळा हे वॉर्डरोब मालफंक्शन म्हणजे प्रसिद्धीचा सवंग मार्ग असल्याचं म्हटलं जातं. रँपवर कॅटवॉक करतानाही अनेक मॉडेल्सना अशा वॉर्डरोब मालफंक्शनमुळे लज्जित व्हावं लागलं आहे.
First Published: Monday, August 27, 2012, 11:09