Last Updated: Tuesday, July 16, 2013, 10:07
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘फटा पोस्टर निकला हिरो’मधून शाहिद कपूर मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षकांसमोर येतोय. याच सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.
या चित्रपटात, अभिनेता बनण्याची इच्छा मनात बाळगणाऱ्या शाहिद कपूरला पोलीस बनाव लागलंय. शाहिदचं कॅरेक्टर प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी हा ट्रेलर पाहणं पुरेसं आहे. चित्रपटातले स्टंटसची झलकही हा ट्रेलर देऊन जातोय. ‘बर्फी’मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेली इलियाना डीक्रूझ या चित्रपटात ‘लव्हली गर्ल’ साकारतेय.
हा सिनेमा २० सप्टेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध होण्याची चिन्ह आहेत. प्रीतमनं या चित्रपटाला संगित दिलंय तर रमेश तौरानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय.
पाहुयात याच चित्रपटाचा थ्रीलिंग ट्रेलर... •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, July 16, 2013, 10:06