Last Updated: Monday, April 8, 2013, 15:42
www.24taas.com, मुंबई बॉलीवूडची अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू हे लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैफ अली खानचा आणि करीनाचे लग्न झाल्यापासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता.
यावर कुणाल खेमूला विचारण्यात आल असता तो म्हणाला की, ‘सध्या तरी आमच्या लग्न करण्याच्या काही योजना नाही. पण सगळं सुरळीत पार पडलं तर आम्ही लवकरच लग्न करू.’ मागच्या काही दिवसापासून हे दोघ एकत्र फिरताना दिसत आहेत आणि त्यांच्या नातेसंबंध बेधडकपणे कबूल करतात.
या दोघांनी नुकतच खारमध्ये एक नवीन घर घेतलं आहे. सोहाने नुकतचं एका मुलाखतीत सांगितल की, ती नुकतीच कुणाल खेमूसोबत राहायला गेली आहे.
First Published: Monday, April 8, 2013, 15:42