Last Updated: Wednesday, January 8, 2014, 13:49
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या मनात सध्या एली अवराम आहे. असं खुद्द सलमाननंच जाहीर केलंय.
रिअॅलिटी शो बिग बॉस-७ ची एक स्पर्धक आणि स्वीडन-ग्रीक अभिनेत्री एली अवराम हिला प्रमोट करण्याचा बेत सल्लू मियाँनं पक्का केलाय. तो एलीला एका सिनेमात कामही देणार आहे. ‘रिअॅलिटी शो बिग बॉस-७’मध्ये सलमान खाननं होस्ट केला होता. या रिअॅलिटी शोचा हा सिझन नुकताच संपलाय.
एली तुझ्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसून येणार का? या प्रश्नावर सलमाननं म्हटलं, ‘जेव्हा डायरेक्टर आणि प्रोड्युसर एलीला सिनेमात घेऊन येतील तेव्हा तुम्हीही तिला पाहू शकाल. निश्चितच सध्या आमच्या मनात एलीच आहे’. एलीनं ‘मिकी वायरस’ या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला प्रारंभ केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 8, 2014, 13:38