रॉकस्टार नर्गिस आणि उदय चोप्रा... जोडी जमली?, Wedding bells for Nargis Fakhri and Uday Chopra?

जोडी जमली... रॉकस्टार नर्गिस आणि उदय चोप्रा

जोडी जमली... रॉकस्टार नर्गिस आणि उदय चोप्रा
www.24taas.com, मुंबई

बऱ्याच दिवसानंतर बॉलिवूडमध्ये उदय चोप्रा या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, आता या नावासोबत आणखी एक नावं जोडलं जातंय आणि ते म्हणजे, रॉकस्टार फेम नर्गिस फाकरी हिचं...

मिळालेल्या माहितीनुसार, उदय चोप्रा सध्या नर्गिस फाकरी हिच्यासोबत विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. पण, या दोघांनी मात्र या बातमीला अजुनही दुजोरा दिलेला नाही. पण, बॉलिवूडमध्ये मात्र ‘रॉकस्टार’मधील ही बाला आणि उदय चोप्रा यांच्या जवळकीच्या चर्चा जोरदारपणे रंगताना दिसत आहेत.

आपल्या मनमोहक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या या कन्येनं स्विमसूटमधून मॉडेलिंगच्या जगात एकच खळबळ उडवून दिली होती. नर्गिस आणि उदय या दोघांना अनेक कार्यक्रमात आणि पार्टीजमध्ये एकत्र पाहिलं गेलंय. त्यामुळे आता या दोघांत फक्त मैत्रीचं नातं नाही तर आणखीही काहीतरी असल्याची बातमी जोरावर आहे. एव्हढंच नाही, तर त्यांच्या प्रेमाचं रुपांतर लवकरच लग्नामध्ये होणार असल्याचंही खात्रीने सांगितलं जातंय.

फिल्मफेअर मॅगझीनच्या मते, या दोघांच्याही कुटुंबीयांकडून या लग्नाला अगोदरच होकार मिळालाय. दोघांनी उघडपणे या बातमीला होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही. जर सगळं काही सुरळीत राहिलं तर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकताना दिसले तर तुम्हालाही आश्चर्य वाटायला नको.

First Published: Friday, January 4, 2013, 16:27


comments powered by Disqus