त्या रात्री का झालं होतं शाहरुख-सलमानमध्ये भांडण, What happend in shaharukh and salman on that night

का झालं होतं शाहरुख-सलमानमध्ये भांडण

का झालं होतं शाहरुख-सलमानमध्ये भांडण


www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शाहरुख आणि सलमान दोघंही आज जरी एकत्र आले असले तरी 2008 साली त्या रात्री नेमकं काय घडलं.. कशामुळे या खानवॉरला सुरुवात झाली..

अभिनेत्री कतरिना कैफची बर्थ डे पार्टी.. सलमानने आपली गर्लफ्रेण्ड कतरिना कैफच्या वाढदिवसानिमित्त एका खास पार्टीच आयोजन केलं होतं.. बॉलिवूडचे अनेक नामवंत कलाकार या पार्टीत हजर होते.. शाहरुखनेही पत्न गौरीसह या पार्टीत हजेरी लावली होती.. पार्टी चांगलीच रंगात आली होती.. आणि त्याचवेळी सलमानने शाहरुखला डिवचायला सुरुवात केली..

तुम्हारा शो पांचवी पास.. तो फ्लॉप है.. और अब तुम मेरे शो.. दस का दम को खराब करने की कोशिष करने मे लगे हो..
सलमान खान एवढ्यावरच थांबला नाही..
तुम मतलबी इनसान हो.. तुम लोगों से तभी बात करते हो जब तुम्हे उनकी जरुरत होती है.. तुम मुझसे बात मत करना..
इतका वेळ शांत असलेल्या शाहरुखने मग सलमानला चांगलच सुनावल..
कोई तुम्हारा शो नहीं देखना चाहता.. कोई भी तुमसे दोस्ती नहीं करना चाहता..
शाहरुखचं हे उत्तर ऐकून भडकलेल्या सलमानने शाहरुखवर पलटवार केला..
तुम चुप रहो.. नहीं तो, मैं तुम्हे पीटूंगा..
शाहरुखनेही मग सलमानला सडेतोड उत्तर दिलं..
तू क्या मारेगा मुझे? तू हाथ तो उठा.. मै मारुंगा तुझे.. वो भी तेरी पार्टी मैं.. और तेरे दोस्तों के सामने..
सलमान आणि शाहरुखचा हा वाद नंतर आणखीनच भडकला.. अखेर पत्नी गौरी आणि कतरिनाने हा वाद थांबवला.. 16 जुलै 2008 ला घडलेल्या या घटनेनंतर दोघांमध्ये ब्रेक अप झालं.. एकमेकांचे जिगरी दोस्त असलेल्या या दोघांनी त्यानंतर एकमेकांना घालून पाडून बोलण्याची एकही संधी सोडली नाही.. सलमानने शाहरुखला मै और मिसेस खन्ना या सिनेमात कॅमिओ करण्यास सागितलं.. मात्र, शाहरुखने सलमानच्या सिनेमात काम करण्यास नकार दिला.. त्यानंतर दोघही एका पार्टीमध्ये जरी असले तरी एकमेकांशी एकही शब्द बोलले नाहीत.. मात्र, अखेर तब्बल 5 वर्षांनंतर रविवारी झालेल्या इफ्तार पार्टीत त्यांच्या नात्यातली कटूता मिटली..


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 22, 2013, 17:50


comments powered by Disqus