बिपाशा आणि इशामध्ये रंगतेय कॅटफाईट!What`s happening between Esha Gupta and Bipasha Basu on sets

बिपाशा आणि इशामध्ये रंगतेय कॅटफाईट!

बिपाशा आणि इशामध्ये रंगतेय कॅटफाईट!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमधील कॅट फाईट तर नित्याचीच बाब बनली आहे. आता अशीच फाईट रंगलीय ती बिपाशा बासू आणि इशा गुप्ता मध्ये. या दोन हिरोईन्समधून सध्या विस्तवही जात नाही.

बिपाशा आणि इशामध्ये रंगतेय कॅट फाईट... एका आगामी फिल्ममध्ये बिपाशा बासू आणि इशा गुप्ता एकत्र काम करतायेत. या फिल्मच्या शूटिंग दरम्यान दोघींमध्ये वाजल्याची जोरदार चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये रंगतेय. मात्र बिपाशा आणि इशानं याला साफ नकार केलाय.

या फिल्ममध्ये आमच्या दोघींचा एकही सीन अद्याप शूट झालेला नाही असं इशाचं म्हणणं आहे. तसंच फिल्ममध्ये बिपाशा रितेश बरोबर आणि मी सैफ बरोबर काम करतेय. आमच्या भूमिकाही वेगळ्या आहेत. त्यामुळं आमच्या दोघींमध्ये फाईट होण्याचा प्रश्नच कुठं असा सवालच चक्क इशानं केलाय.

याआधी ‘राज ३’मध्येही या दोघींची जोडी दिसली होती. बिपाशा ही इंडस्ट्रीमध्ये सिनिअर अभिनेत्री आहे आणि ती माझीही सिनिअर आहे. मी तिचा खूप आदर करते. त्यामुळं माझ्या मनात तिच्य़ाबद्दल कसलाही कडवटपणा नाही. येणाऱ्या उलट सुलट बातम्या आणि अफवांमुळं उलट मी खूपच अपसेट आहे असं, म्हणून तिनं या फाईटला पुर्णविराम दिलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 22, 2013, 09:20


comments powered by Disqus