ट्रेलर पाहा : `व्हॉट द फिश`... डिम्पलचा कॉमिक अवतार!, ‘What the Fish’ trailer: Dimple Kapadia’s neve

ट्रेलर पाहा : `व्हॉट द फिश`... डिम्पलचा कॉमिक अवतार!

<B><font color=red> ट्रेलर पाहा : </font></b>`व्हॉट द फिश`... डिम्पलचा कॉमिक अवतार!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गेल्या कित्येक दिवसांपासून डिम्पल कपाडिया मोठ्या पडद्यावरून दूर राहिली होती... पण, आता एका नव्या अवतारात दाखल झालेल्या डिम्पल या काळातील कमतरताही भरून काढणार असंच दिसतंय.

‘व्हॉट द फिश’ नावाच्या एका कॉमेडी सिनेमातून डिम्पल आपल्यासमोर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या एका महिलेची भूमिका डिम्पलही एन्जॉय करताना दिसतेय, असं या सिनेमाचा ट्रेलर पाहून लक्षात येतंय. कदाचित रोमॅन्टिक आणि गंभीर भूमिका करून तीही कंटाळलीय. त्यामुळेच तीनं आता वेगळी वाट शोधून काढलीय.
सिनेमाचा ट्रेलर पाहताना तुम्हालाही जाणवेल की एका कॉमिक कॅरेक्टरमध्येही डिम्पलला पाहायला मजा येतेय. सुधा मिश्रा ही घटस्फोटीत आणि थोडी खडूस महिलेच्या भूमिकेत ती आहे. काही कामानिमित्त बाहेर पडण्याआधी आपलं दिल्लीतलं राहतं घरत ती तिच्या भाचीच्या भावी नवऱ्याकडे म्हणजेच सुमितकडे सोपावते. पण, त्यानंतर घरात काय घडतं.... हे तुम्हाला हा ट्रेलर पाहून लक्षात येईलच...

‘व्हॉट द फिश’ हा सिनेमा गुरमित सिंग यांनी दिग्दर्शित केलाय. हा सिनेमा १३ डिसेंबर २०१३ रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.

पाहा... `व्हॉट द फिश`चा ट्रेलर



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 25, 2013, 16:27


comments powered by Disqus