... अन् अमिताभला बसला प्रचंड धक्का, when amitabh forgot his laptop in Italy

... अन् अमिताभला बसला प्रचंड धक्का

... अन् अमिताभला बसला प्रचंड धक्का
www.24taas.com, मुंबई

आपण सहज बाजारात फेरफटका मारत असताना आपला लॅपटॉप विसरलो तर... आपलं सगळं काही हरवलंय आणि आता सगळं थांबतंय की काय असं आपल्या समस्त सामान्यजनांना वाटलं तर... त्यात काही नवल नाही, नाही का?... पण असाच प्रसंग बीग बी अमिताभ बच्चन यांनी नुकताच अनुभवलाय.

इटलीच्या फ्लोरेन्स शहराचा फेरफटका मारत असताना बीग बी अमिताभ बच्चन आपला लॅपटाप विसरले अन् त्यांना धक्काच बसला. आपण सगळं काही हरवून बसलोय, असं क्षणभर त्यांनाही वाटलं. भारतीय फिल्म महोत्सव ‘ रीव्हर टू रीव्हर’मध्ये सहभागी होण्यासाठी अमिताभ फ्लोरेन्स शहरात दाखल झाले होते. त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे त्यांच्या चाहत्यांशी शेअर केलाय.

‘माझा सहाय्यक माझा लॅपटॉप पॅक करायला विसरला आणि तो बिना लॅपटॉप आईलेलाही पोहचला. या घटनेनं मात्र माझ्यासाठी खूपच त्रासदायक होती. माझं भाग्य म्हणून माझा सीईओ इटलीमध्येच होता. त्यानं तो त्या जागेवरून हा लॅपटॉप सहिसलामत मिळाला आणि मला हा लॅपटॉप मिळाला तो मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतरच...’ असं अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

First Published: Tuesday, December 11, 2012, 13:30


comments powered by Disqus