अर्जुननं सलमानला चक्क रडवलं! , When Arjun Kapoor made Salman Khan cry

अर्जुननं सलमानला चक्क रडवलं!

अर्जुननं सलमानला चक्क रडवलं!
www.24taas.com, मुंबई

नवीन कलाकारांना अनेकदा सलमान खानकडून उपदेशाचे डोस मिळत असतात. त्याच्या शिष्यांत आता बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूरचाही समावेश झालाय. सलमानला गुरुच्या स्थानी मानणाऱ्या याच अर्जुननं सलमानला चक्क रडायला भाग पाडलंय.

‘यशराज’ बॅनरच्या ‘इशकजादें’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारा अर्जुन कपूर लवकरच ‘औरंगजेब’ या थ्रीलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं ट्रेलर नुकतच लॉन्च झालंय. त्यानिमित्ताने अर्जुननं सलामानला ट्रेलर दाखवण्यासाठी घरी आमंत्रण दिलं होतं.

औरंगजेब सिनेमाचा ट्रेलर बघुन सलमान थक्कच झाला. एव्हढचं नाही तर, अर्जुनची मेहनत आणि त्याच्या आतला सच्चा कलाकार बघून सलमानच्या डोळ्यात चक्क अश्रू तरळले.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘सलमानला ते ट्रेलर खूप आवडलं. ते ट्रेलर बघून सलमानला आपल्या आसवांना आवर घालता आला नाही आणि सलमानच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले.’

First Published: Wednesday, April 10, 2013, 08:38


comments powered by Disqus