दीपिकावर अंडी, टोमॅटो फेकून मारण्याचा बेत रद्द, When Deepika Padukone had a close shave in Ahmedabad

दीपिकावर अंडी, टोमॅटो फेकून मारण्याचा बेत रद्द

दीपिकावर अंडी, टोमॅटो फेकून मारण्याचा बेत रद्द
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर अंडी, टोमॅटो फेकून मारण्यात येणार होते. मात्र सुदैवाने दीपिका या कठीण प्रसंगातून वाचली. अहमदाबादमध्ये गरबा इव्हिनिंगच्या कार्यक्रमात दीपिका आपल्या `रामलीला` सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी काही नाराज लोक तिच्यावर अंडी, टोमॅटो फेकणार होते.

दीपिका पदुकोणच्या आगामी रामलीला सिनेमातील काही संवादांवर लोकांनी आक्षेप घेतला होता. याविरोधात निदर्शनही करण्यात आली होती. याच सिनेमाच्या प्रमोशनाठी दीपिका गरबा इव्हेंटला आली होती. यावेळी तिच्यावर अंडी, टोमॅटो फेकण्याचा विरोधकांचा बेत होता. मात्र त्यापूर्वीच रामलीला सिनेमाच्या निर्मात्यांनी आपल्या सिनेमातून वादग्रस्त कंटेंट काढून टाकल्याचं जाहीर केलं.

यामुळे विरोधकांनी दीपिकावर अंडी, टोमॅटो फेकण्याचा बेत रद्द केला. जडेजा आणि राबडी समाजाचे लोक दीपिकावर अंडी आणि टोमॅटो फेकून मारणार होते. मात्र त्यापूर्वीच सिनेमातील वादग्रस्त संवाद काढून टाकल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी हा बेत रद्द केला. `रामलीला` हा संजय लीला भन्साली यांचा आगामी सिनेमा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013, 08:49


comments powered by Disqus