Last Updated: Thursday, October 4, 2012, 15:49
www.24taas.com, मुंबई बॉलिवुडच्या दोन टॉपच्या अभिनेत्री ऐश्वर्या आणि कतरिनामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे एकेकाळी या दोघींचा संबंध सलमान खानशी होता. नुकतेच या दोघी अमेरिकेतील शिकागोमध्ये आमने-सामने आल्या होता. अशी भेट झाली की मोठा धमाका होईल असा कयास अनेकांना बांधला होता, परंतु नाही असे काहीच झाले नाही.
कतरिना आणि ऐश्वर्या शिकागोमध्ये भेटल्या. त्यांनी एकमेकांना पाहिले आणि हाय हॅलो केले आणि कन्नी कापत तेथून निघून गेल्या.
ऐश्वर्या आणि कतरिनाची ही टक्कर धूम- ३ च्या शुटींग दरम्यान झाली. ऐश्वर्या राय आपल्या मुलीसह धूम-३ च्या सेटवर आली होती. या चित्रपटात अभिषेक बच्चन काम करीत आहे. त्याच्यासह आमिर खान आणि कतरिना कैफही काम करीत आहे.
यावेळी ऐश्वर्याने आपली मुलगी आराध्या आणि अभिषेकसोबत काही वेळ घालविला. त्याचवेळी कतरिनाचा सीन सुरू होता. त्यामुळे त्यांनी एकमेकांना पाहिले. एकमेकांकडे पाहून हसल्या आणि हाय हॅलो करून तेथून निघून गेल्या. ऐश आणि कॅटला सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांशी बोलताना अजून कोणी पाहिले नाही.
ऐश्वर्याच्या वाढदिवसाला एका न्यूज चॅनलने कतरिनाला शुभेच्छा देण्यास सांगितले तेव्हा तीने शुभेच्छा न देता विषय बदलला होता.
First Published: Thursday, October 4, 2012, 15:49