सनी लिओनची भर रस्त्यात छेडछाड..., when sunny leone got felt up in an auto rickshaw

सनी लिओनची भर रस्त्यात छेडछाड...

सनी लिओनची भर रस्त्यात छेडछाड...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत अभिनेत्री सनी लिओन हिला भररस्त्यात छेडछाडीच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलंय.

सनी तिच्या आगामी `रागिनी एमएमएस २`च्या प्रमोशनसाठी एका ऑटोमध्ये बसली होती. याच दरम्यान तिच्यासोबत छेडछाडीचा प्रयत्न करण्याता आला.

प्रमोशन दरम्यान सनी आपल्या सिनेमाचे काही उत्तेजक पोस्टर ऑटोच्या पाठिमागे लावत होती. तेव्हाच काही जण एकत्र जमले आणि त्यांनी सनीच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

एका वर्तमानपत्राशी बोलताना सनीनं या वृत्ताला दुजोरा दिलाय. आम्ही सिनेमाचं प्रमोशन करत असताना ऑटो मालकाशी बोलत होतो. अचानक, कुणीतरी अगदी जवळ येऊन आपल्याला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचं तिनं म्हटंलय. त्यानंतर पोलिसांनी येऊन लोकांना तिथून हटवलं. एव्हाना, सनीला ऑटोचा आसरा घ्यावा लागला होता. प्रमोशन दरम्यान सनी ब्लॅक टाइटस् आणि सफेद-गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये दिसली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 20:52


comments powered by Disqus