कोण म्हणतं यावर्षी सलमानचा नवा सिनेमा येणार नाही? Who says it’s a dry year for Salman Khan fans?

कोण म्हणतं यावर्षी सलमानचा नवा सिनेमा येणार नाही?

कोण म्हणतं यावर्षी सलमानचा नवा सिनेमा येणार नाही?
www.24taas.com, मुंबई

सलमान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. २०१३ मध्ये सलमान खानचा एकही सिनेमा रिलीज होणार नव्हता. मात्र आता सलमान खानचा नवा सिनेमा याच वर्षी पाहायला मिळणार असल्याचं सोहेल खानने सांगितलं आहे.

सलमान खानचा आगामी सिनेमा ‘मेंटल’ हे १४ जानेवारी २०१४ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र चाहत्यांना एवढी प्रतिक्षा करायला लागू नये, यासाठी त्या सिनेमाचं शुटिंग लवकरात लवकर पूर्ण करून या वर्षीच सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. सोहेल म्हणाला “आमच्या सिनेमाला उशिर होणार नाही. मात्र आम्ही घाईघाईतही हा सिनेमा पूर्ण करू इच्छित नाही. जेव्हा सिनेमाची योग्य वेळ येईल. तेव्हा तो लोकांसमोर येईलच, य़ाच वर्षी तो प्रेक्षकांसमोर यावा, अशी माझीही इच्छा आहे.”



सध्या मेंटल सिनेमाचं शुटिंग पुण्याजवळील लवासामध्ये सुरू आहे. तीन आठवड्यांचंच येथील शुटिंग होतं. मात्र आता ते शेड्युल ५ आठवड्यांचं करून सिनेमा लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा, यासाठी सलमान खान काम करत आहे. यावर्षी येणारा ‘मेंटल’ सलमानच्या इतर सिनेमांप्रमाणेच १०० कोटी कमावेल का, हे तो रिलीज झाल्यावरच समजेल.

First Published: Sunday, April 14, 2013, 15:36


comments powered by Disqus