कोणी फूट पाडली जॉन –बिपाशामध्ये ? , WHO WAS RESPONSSIBLE FOR JAOHN- BIPASHA BREAK UP

कोणी फूट पाडली जॉन –बिपाशामध्ये ?

कोणी फूट पाडली जॉन –बिपाशामध्ये ?
www.24taas.com, मुंबई

जॉन अब्राहिम आणि बिपाशा बासू यांच्या ब्रेकअपला बरीच प्रसिद्धी मिळाली. बिपाशानं आपल्या ब्रेकअपंचं सारं खापर जॉनच्या डोक्यावर जाहीररित्या फोडलं... पण, सूत्रांच्या माहितीनुसार, या जोडीचं विभक्त होण्याचं कारण मात्र वेगळंच आहे...

‘आमचं ब्रेकअप होण्यासाठी जॉनच जबाबदार आहे’ असं बिपाशा सगळीकडे सांगत सुटली असली तरी या ब्रेकअपची खरी सूत्रधार तर बिप्सचं होती, असं जॉनच्या एका निकटवर्तीय सूत्राचं म्हणणं आहे. नुकतचं जॉनच्या एका मित्रानं एका वेबसाईटच्या माध्यमातून हे सांगून बिप्सच्या आरोपांना सपशेल फेटाळलंय. जॉनच्या या मित्राच्या म्हणण्यानुसार, बिपाशा बासू आणि हॉलीवूड अभिनेता जोश हार्टनेट यांची वाढलेली जवळीक जॉनबरोबरच्या ब्रेकअपसाठी कारणीभूत ठरली. ‘सिंग्युल्यारिटी’ सिनेमाच्या शूटींगसाठी जोश आणि बिपाशा एकत्र आले होते.

जॉन-बिप्सचं ब्रेकअप मिडियामध्ये प्रसिद्ध होण्याच्या कित्येक दिवस आधीच त्या दोघांत फूट पडली होती. ब्रेक-अपनंतर जॉनचं भारताबाहेर शिकत असलेल्य प्रिया रुंचालसोबत डेटींग सुरू झालं. त्यानंतर मात्र चिडलेल्या बिपाशानं जॉननं आपल्याला चीट केल्याचा आरोप केला. यामुळे जॉनला अनेक अडचणींनाही सामोर जावं लागत होतं, असा जॉनच्या मित्राने नुकताच खुलासा केला आहे.

ब्रेकअपनंतर एकमेकांबद्दल मीडियासमोर जाहीरपणे बोलण्याचं जॉन टाळत असला तरी बिप्सनं मात्र जॉनच्या अफेअरची चर्चा जाहिररित्या केली होती. जॉननं मात्र त्यालाही प्रत्यूत्तर दिलं नाही. सबंधित सूत्राच्या माहितीनुसार, जॉननं ब्रेकअपनंतर आपल्या आणि आपल्या एक्स गर्लंफ्रेंडचं नातं खूप समजूतदारपणे घेतलंय. जॉन आपल्या आयुष्यात पुढे गेलाय आणि बिपाशानंही जुनं जुनं सगळ विसरून पुढे जावं अशी त्याची इच्छा आहे, असंही त्याच्या या मित्रानं म्हटलंय.

First Published: Friday, April 12, 2013, 11:23


comments powered by Disqus