ईदेच्या दिवशी सलमान-अक्षयमध्ये शर्यत Who will win the tug of war: Akshay Kumar or Salman Khan?

ईदेच्या दिवशी सलमान-अक्षयमध्ये शर्यत

ईदेच्या दिवशी सलमान-अक्षयमध्ये शर्यत
www.24taas.com, मुंबई

गेली 4 वर्षं ईदच्या दिवशी सलमान खानचे सिनेमे रिलीज होत आहेत आणि ते ही ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत. वाँटेड, दबंग, बॉडीगार्ड आणि एक था टायगर यासारखे 4 धमाकेदार हिट दिल्यावर पुढच्या इदला सलमान खान शेरखान सिनेमातून लोकांसमोर येत आहे.

पण यावेळी सलमान खान ईदेच्या दिवशी अक्षय कुमारशी शर्यत लढवावी लागणार आहे. कारण, यावर्षी सलमान खानचा शेर खान रिलीज होत आहे, त्याच दिवशी अक्षय कुमारचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई 2’ हा सिनेमाही रिलीज होत आहे.

सलमान आणि अक्षय कुमार यांच्यात चांगलीच मैत्री आहे. पण या वर्षी ईद या दोन्ही मित्रांसाठी स्पर्धा करणारी ठरेल. शेर खानला टक्कर देणं अक्षयला कितपत जमेल, हे आत्ताच सांगणं अवघड आहे. पण, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईच्या पहिल्या भागाने दणक्यात बिझनेस केला होता. त्यामुळे दुसऱ्या भागाबद्दलही सगळ्यांमध्ये उत्सुकताच आहे. तेव्हा दुसऱ्या भागालाही चांगलाच प्रतिसाद मिळेल, अशी सध्यातरी चित्र आहे. त्यामुळे सलमान अक्षयमधील स्पर्धा चांगलीच रंगणार आहे.

First Published: Wednesday, October 3, 2012, 22:28


comments powered by Disqus