Last Updated: Tuesday, March 4, 2014, 18:57
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रिती झिंटाच्या राजकीय प्रवेशावरून जोरदार चर्चा रंगलेली दिसतेय. प्रिती झिंटा अभिनेता संजय दत्तची बहिण प्रिया दत्त हिला लोकसभा निवडणुकीत टक्कर देण्याची शक्यता आहे.
प्रिती झिंटा हिला भाजपाकडून खासदार प्रिया दत्त हिच्याविरोधात उभं राहण्यासाठी तिकीट दिलं जाऊ शकतं. प्रितीनंही भाजपच्या या प्रस्तावाला होकार दिला असल्याचंही सांगितलं जातंय.
महत्त्वाचं म्हणजे, अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या खासदार आहेत. २००४ या वर्षापासून प्रिया दत्त या जागेवरून सतत निवडून आल्या आहेत. याच प्रिया दत्त यांना प्रिती मात्र लोकसभा निवडणुकीत छोबीपछाड देऊ शकते, अशी चर्चा भाजपच्या गोटातही आहे.
भाजपचे महासचिव राजीव प्रताप रुडी यांना आपल्या जागेवरून कुणी सिनेकलाकार उभा राहावं, अशी इच्छा आहे. परंतु, या बातमीला अजून अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 4, 2014, 16:14