सोनम कपूर करणार रिअॅलिटी शो?Will Sonam Kapoor Be in Reality Show?

सोनम छोट्या पद्यावर, करणार रिअॅलिटी शो?

सोनम छोट्या पद्यावर, करणार रिअॅलिटी शो?
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

अभिनेता अनिल कपूर '२४'या हॉलिवूड शोला भारतीय टच देऊन छोटय़ा पडद्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न करतो आहे. आपली चित्रपट कारकिर्द सांभाळतानाच सोनम कपूरनेही छोटय़ा पडद्यावर काम करण्यात रस असल्याचे जाहीर केले आहे.

सोनमला याआधीही टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शो करण्याचे प्रस्ताव आले होते, पण तेव्हा चित्रपटांवर जास्त लक्ष केंद्रीत केलेल्या सोनमने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. मात्र 'रांझना' आणि 'भाग मिल्खा भाग' या दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळाल्यावर सोनमची बॉलिवूड कारकिर्द रुळावर आली आहे.

आता चित्रपट आणि जाहिरातींबरोबरच आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करायला सोनमने सुरुवात केली आहे. सोनमची फॅशनबद्दलची आवड जग जाहीर आहे. स्वत:चा फॅशन ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी सध्या ती धडपडत आहे. शिवाय ती लहान मुलांमध्ये, विशेषत: ती किशोरवयीन मुलामुलींमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुलांशी संबंधित रिअॅलिटी शोचे प्रस्ताव मोठय़ा प्रमाणावर येत आहेत. यातल्या एखाद्या रिअॅलिटी शोची संकल्पना आपल्याला आवडली तर आपण लवकरच छोटय़ा पडद्यावर येण्यास उत्सुक असल्याचे संकेत सोनमने दिले आहेत. सध्या ती 'खूबसूरत' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये व्यस्त आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013, 15:30


comments powered by Disqus