Last Updated: Tuesday, October 29, 2013, 09:14
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेता हृतिक रोशन याच्या ‘क्रिश-३`ची स्क्रिप्ट चोरीची असल्याचा आरोप मध्य प्रदेशच्या एका लेखकानं केलाय. त्याविरोधात मुंबई हायकोर्टात स्वामित्व हक्कभंगाची याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी आहे.
इंडियन सुपरहीरो ही संकल्पना असलेल्या ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश` चित्रपटांना यापूर्वी चांगलंच यश मिळालंय. याच श्रेणीतील ‘क्रिश ३` चित्रपट ऐन दिवाळीत १ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटाची पटकथा मी लिहिली आहे. मात्र, मला निर्माता राकेश रोशन यांनी श्रेय दिलेलं नाही, अशी तक्रार करणारी याचिका काल मध्य प्रदेशातील उदयसिंह राजपूत नावाच्या लेखकानं दाखल केलीय.
या चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत मला दोन कोटी रुपयांची भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेत केली आहे.
‘क्रिश-३’मध्ये अभिनेता हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावत यांच्या मुख्य भूमिका आहेत. राजपूत यांनी दाखल केलेल्या या याचिकेमुळं चित्रपट रिलीज होण्यावर काही परिणाम होईल का हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 29, 2013, 08:39