यश चोप्रा लीलावती रूग्णालयात , Yash Chopra ill, admitted to Lilawati

यश चोप्रा लीलावती रूग्णालयात

यश चोप्रा लीलावती रूग्णालयात
www.24taas.com,मुंबई

८० वर्षीय प्रसिध्द चित्रपट निर्माता यश चोप्रा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना बांद्रा येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यश चोप्रा यांना डेंग्यू झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यश चोप्रा यांनी गेल्या महिन्यात वाढदिनी सेवानिवृत्ती जाहीर केली होती. ही सेवानिवृत्ती ‘जब तक है जान’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर घेणार असल्याचे स्पष्टे केले होते. हा सिनेमा येत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात कतरिना, शाहरूख खान, अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

यश चोप्रां यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्यांनी पाच दशकांहूनही अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये अधिराज गाजवले आहे. दीवार, कभी कभी, त्रिशूल, सिलसिला, चांदणी, वीर जारा आदी त्यांचे चित्रपट हिट्स झाले आहेत.

First Published: Sunday, October 14, 2012, 18:07


comments powered by Disqus