‘ये जवानी है दिवानी’ टिव्हीवर दाखवू नका!, Ye jawani hai diwani Do not show on TV!

‘ये जवानी है दिवानी’ टीव्हीवर दाखवू नका!

‘ये जवानी है दिवानी’ टीव्हीवर दाखवू नका!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सध्या १०० करोड कमाईच्या यादीत पोहोचलेला आणि प्रचंड यश मिळवलेला ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट टीव्हीवर दाखवू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या आदेशामुळे हा चित्रपट एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमा विरोधात रुहअफजा या सरबत कंपनीने एक याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करताना हे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीने चित्रपटातील काही संवादावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कोर्टाने निर्माता, दिग्दर्शक आणि संवाद लिहिणाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. १६ जुलैला याची सुनावणी होणार आहे.


रूहअफजा बनवणारी हमदर्द नॅशनल फाऊंडेशनने केलेल्या याचिकेवर निर्णय सांगताना न्यायाधीश मनमोहन सिंग यांनी असे म्हटले आहे की, हा विरोध चित्रपटपगृहात प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटांवर नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013, 17:29


comments powered by Disqus