Last Updated: Friday, September 14, 2012, 12:16
www.24taas.com, मुंबई अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या युक्ता मुखी हिनं मुंबई पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती दिलीय.
उत्तर पश्चिम मुंबईस्थित आंबोली पोलीस स्टेशनमध्ये युक्तानं पती प्रिन्स तुलीविरुद्ध एनसी नोंदवलीय. प्रिन्स आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याची तक्रार यावेळी तिनं केलीय.
लंडनमध्ये १९९९ साली मिस वर्ल्ड स्पर्धेत ‘युक्ता’नं मिस वर्ल्डचा मुकूट परिधान केला होता. यानंतर युक्तानं काही काळ बॉलीवूडमध्यल्या काही मोजक्या सिनेमांतही काम केलंय. त्यानंतर ३ नोव्हेंबर २००८ रोजी लंडनस्थित व्यावसायिक प्रिन्स तुली याच्याबरोबर युक्ताचा विवाह झाला होता. तुली कुटुंबीय मूळचं नागपुरचं असून हॉटेल, बांधकाम, शिक्षण, मॉल्स या क्षेत्रात त्यांचा व्यवसाय पसरला आहे.
First Published: Friday, September 14, 2012, 12:15