`झी` पुरस्कार नामांकन :फँड्री-दुनियादारीचा दबदबा, Zee Award Nominations: Fandri, Duniyadari

`झी` पुरस्कार नामांकन : फँड्री-दुनियादारीचा दबदबा

`झी` पुरस्कार नामांकन :  फँड्री-दुनियादारीचा दबदबा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`झी गौरव पुरस्कार २०१४`ची नामांकने घोषित करण्यात आली असून चित्रपट कॅटेगरीत फँड्री आणि दुनियादारी या सिनेमांना सर्वाधिक नामांकने मिळालीत.

दिग्दर्शनासाठी नागराज मंजुळे, संजय जाधव, समृध्दी पोरे, नितीन दिक्षित आणि अभिजीत पानसे यांना नामांकन मिळाल आहे. सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, इरावती हर्षे, सोनाली कुलकर्णी, वीणा जामकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तर नाना पाटेकर, मोहन आगाशे, सचिन खेडेकर, सुबोध भावे, अंकुश चौधरी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन यादीत स्थान मिळवलं

झी गौरव पुरस्कार २०१४च्या शर्यतीत फँड्री, दुनियादारी, अवताराची गोष्ट, रेगे आणि अस्तू या चित्रपटात चांगलीच चुरस रंगणार आहे. दिग्दर्शनासाठी नागराज मंजुळे, संजय जाधव, समृध्दी पोरे, नितीन दीक्षित आणि अभिजीत पानसे यांना नामांकन मिळाल आहे.

सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, इरावती हर्षे, सोनाली कुलकर्णी, वीणा जामकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तर नाना पाटेकर, मोहन आगाशे, सचिन खेडेकर, सुबोध भावे, अंकुश चौधरी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन यादीत स्थान मिळवलं...

झी गौरव पुरस्कार २०१४ मध्ये नामांकनात दुनियादारीला ११ तर फँड्री सात नामांकनं मिळाली आहेत. चित्रपटांप्रमाणेच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचीही नामांकने यावेळी जाहीर करण्यात आली. आता या शर्यतीत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 8, 2014, 09:36


comments powered by Disqus