पांचोलीची `झी मीडिया`च्या महिला रिपोर्टरला मारहाण, zee media correspondent beaten by aaditya panchol

पांचोलीची `झी मीडिया`च्या महिला रिपोर्टरला मारहाण

पांचोलीची `झी मीडिया`च्या महिला रिपोर्टरला मारहाण
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आपल्या रागीट स्वभावासाठी चांगलाच परिचीत असलेला बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा आपल्या आक्रमकतेमुळे चर्चेत आलाय. यावेळी तर आदित्यनं ‘झी मीडिया’च्या एका महिला रिपोर्टरला मारहाण केल्याची निंदणीय घटना घडलीय.

काही दिवसांपूर्वी आदित्य पांचोलीनं एका मीडिया रिपोर्टरचा ट्रायपॉड आपल्या कारखाली चिरडला होता तसंच त्यानंतर तो आपल्या शेजाऱ्यांबरोबर केलेल्या भांडणामुळे पुन्हा चर्चेत आला होता. परंतु, यावेळी ‘झी मीडिया’च्या एका महिला रिपोर्टरनं जिया खान आत्महत्या केस संदर्भात त्याला प्रश्न विचारला असता आदित्यनं रागाच्या भरात रिपोर्टरला मारहाण केली. ‘झी मीडिया’च्या टीमसोबत त्यानं दुर्व्यवहारही केला. त्यानंतर आपल्या आपला दरवाजा धाडकन आपटून बंद केला यावेळी ‘झी मीडिया’च्या रिपोर्टरचा हात दरवाजामध्ये अडकला आणि तिला गंभीर इजा झालीय. सोबतच आदित्यनं आमच्या महिला रिपोर्टरसोबत मारहाणही केलीय.

रिपोर्टरच्या हातातून कॅमेरा खेचून घेत आदित्यनं तो फोडून टाकला. या घटनेत महिला रिपोर्टर गंभीर जखमी झालीय. सध्या तिच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याअगोदर, आदित्य पांचोली याच्याविरुद्ध आपल्या शेजारी भार्गव पेटल यांच्यासोबत बाचाबाची आणि मारहाण केल्याप्रकरणी कलम ४५२ आणि ३२३ नुसार गुन्ह्याची नोंद आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 14:46


comments powered by Disqus