LIVE - स्कोअरकार्ड : न्यूझीलंड विरुद्ध द. आफ्रिका, 2014 ICC World Twenty20, Group 1: New Zealand vs

द.आफ्रिकेने २ धावांनी थरारक विजय

www.24taas.com, झी मीडिया, चित्तगाव
अत्यंत चुरशीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या एका रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला अवघ्या २ धावांनी पराभूत करत प्रेक्षकांची मने जिंकली. दक्षिण आफ्रिकेच्या १७० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ८ बाद १६८ धावाच करू शकला.

सुरूवातीला न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेकडून ४७ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८६ धावा काढल्या. त्याला हाशिम आमला याने चांगली साथ दिली. त्याने ४१ धावा काढल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि कॉरी अँडरसन प्रत्येकी दोन तर मिल्स आणि मॅक्युलम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिकेच्या १७० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची चांगली सुरूवात झाली. पहिली विकेट ५७ धावांवर गेली. न्यूझीलंडकडून रॉस टेलर याने ३७ चेंडूत ६२ धावा केल्या तर विल्यमसन याने ३५ चेंडूत ५१ धावा केल्यात. अखेरच्या षटकात सात धावा हव्या होत्या. डेल स्टेनने पुन्हा आपल्या अनुभवाचा फायदा घेत केवळ चारच धावा देत दोन विकेट घेतल्या. यापूर्वी न्यूझीलंडने इंग्लडला नमवले होते. आता न्यूझीलंडला द. आफ्रिकेने नमवले.



LIVE - स्कोअरकार्ड : न्यूझीलंड विरुद्ध द. आफ्रिका


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 24, 2014, 15:02


comments powered by Disqus