दर्बन वनडे: भारतासाठी ‘करो या मरो’!2nd ODI: India vs South Africa - Preview

दर्बन वनडे: भारतासाठी ‘करो या मरो’!

दर्बन वनडे: भारतासाठी ‘करो या मरो’!
www.24taas.com, झी मीडिया

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गमवला होता. त्यामुळं आजच्या सामन्यावर सर्वाचं लक्ष लागून आहे. आजचा सामना हा भारताच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असा ठरणार आहे. हा सामना आज भारतीय वेळेनुसार दीड वाजता दर्बनच्या किंग्जमेड स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

पहिला सामना १४१ रनच्या मोठ्या फरकानं गमवावा लागला. त्यामुळं आजचा सामना हा भारतासाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण की पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानी भारतीय गोलंदाजाना चांगलंच झोडपून काढलं होतं. त्यामुळं आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजानी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये गोलंदाजीची चांगली फळी निर्माण झाली आहे त्यामुळं भारतीय फलंदाजाना देखील महत्त्वपूर्ण खेळी करणं गरजेचं आहे. फलंदाजांनी या सामन्यात शांतपूर्ण खेळी करणं हे भारतासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. भारतीय फलंदाजानी आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी धाव संख्या उभारणं गरजेचं आहे. त्यामुळं त्यांचा फायदा भारतीय गोलंदाजाना दक्षिण आफ्रिकेला रोखण्यास होणार आहे, असे काही बदल भारतीय संघात करणं गरजेचं आहे.

आज होणारा सामना हा अतिशय रंगतदार असा ठरणार आहे. या सामन्यात सर्वांत मोठी मदार गोलंदाजांवर असणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेतील फलंदाजाना रोखणं हे महत्त्वपूर्ण ठरेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 8, 2013, 10:19


comments powered by Disqus