दिवस अखेर भारताच्या ७ बाद २७३ धावा , 3rd Test: India v England at Kolkata

दिवस अखेर भारताच्या ७ बाद २७३ धावा

दिवस अखेर भारताच्या ७ बाद २७३ धावा
www.24taas.com, कोलकाता

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोलकातामध्ये ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या तिस-या कसोटीत पहिल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सूर सापडलाय. त्याने ३४ हजार धावांचाही टप्पा पार केला. असे असले तरी टीम इंडियाने निराशा केली. दिवस अखेर भारताने ९० षटकांत ७ बाद २७३ धावा केल्या.

महेंद्रसिंग धोनी २२ आणि झहीर खान (०) धावांवर खेळत आहेत. आज सकाळी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या प्रमुख फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. वीरेंद्र सेहवाग (२३), चेतेश्वर पुजारा (१६), विराट कोहली (६) आणि युवराज सिंग (३२) यांनी फारशी चकम दाखविली नाही.

मधल्या फळीतील फलंदाज सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध ११ महिन्यानंतर अर्धशतक ठोकत ७६ धावांची खेळी केली. त्याने वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसनला चौकार ठोकत आपले ६६ वे अर्धशतक पूर्ण केले. सचिनने ९९ चेंडूत ९ चौकारासह ५० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर आणखी सलग चौकार सचिनने त्याला मारला. याआधी सचिनने ३ जानेवारी २०१२ रोजी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ८० धावा काढल्या होत्या. त्यानंतर त्याला तब्बल ११ महिने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी वाट पाहावी लागली. मात्र सचिनला अंडरसननेच ७६ धावांवर झेलबाद केले. सचिनच्या ३४ हजार धावा पूर्ण झाल्या आहेत.

सलामीवीर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी चांगली सुरुवात करीत या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. मात्र, तिसरी धाव काढताना गंभीरच्या चुकीमुळे सेहवाग २३ धावांवर धावबाद झाला. त्याने २६ चेंडूत तीन चौकारासह २३ धावा केल्या. भरवशाचा चेतेश्वर पुजारा कमाल दाखवू शकला नाही. अंडरसनने विराट कोहलीला बाद करुन भारताला चौथा धक्का दिला. विराट कोहली ६ धावा काढून बाद झाला.

First Published: Wednesday, December 5, 2012, 17:41


comments powered by Disqus