४२ वर्षीय प्रवीण तांबे मुंबई संघात, 42-year-old pravin tambe in Mumbai team

४२ वर्षीय प्रवीण तांबे मुंबई संघात

४२ वर्षीय प्रवीण तांबे मुंबई संघात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईच्या रणजी क्रिकेट संघाटी निवड करण्यात आली असून ४२ वर्षीय प्रवीण तांबे याला संघात स्थान देण्यात आले आहे. झारखंडविरुद्धच्या रणजी लढतीत अभिषेक नायर मुंबईचे नेतृत्व करणार आहे.

मुंबई संघात नविन चेहेरे आहेत. मात्र, अनुभवी खेळाडू नसल्याने बुजुर्ग प्रवीण तांबे याचा समावेश करण्यात आला आहे. झहीर खान, धवल कुलकर्णी आणि अजित आगरकरच्या अनुपस्थितीत मुंबईची गोलंदाजी अधिक कमकुवत झाली आहे. तसेच झहीरची भारतीय संघात निवड झाली आहे. धवल जखमी आहे, तर आगरकर निवृत्त झाला आहे. त्यामुळे संघामध्ये अनुभवी गोलंदाज नसल्याने ही उणीव दूर करण्यासाठी तांबेची निवड करण्यात आली आहे.

मुंबई संघ
अभिषेक नायर (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), वासीम जाफर, हिकेन शाह, सूर्यकुमार यादव, सुशांत मराठे, विशाल दाभोळकर, सिद्धेश लाड, जावेद खान, शार्दूल ठाकूर, अकबर खान, क्षेमल वायंगणकर, मनीष राव, प्रवीण तांबे, सागर केरकर.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, December 3, 2013, 14:14


comments powered by Disqus