IPLमध्ये एन्ट्री करणार सलमान, घेणार टीम?, after shahrukh khan salman khan to invest in ipl team

IPLमध्ये एन्ट्री करणार सलमान, घेणार टीम?

IPLमध्ये एन्ट्री करणार सलमान, घेणार टीम?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटानंतर आता सलमान खानलाही आता आयपीएल खुणवत आहे. सलमान खान एखाद्या संघात मालक म्हणून प्रवेश करू शकतो.

या संदर्भात आलेल्या बातमीनुसार सलमान शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, जुही चावला आणि प्रिती झिंटाप्रमाणे आयपीएलशी संबंध जोडू शकतो. त्यामुळे एखाद्या आयपीएल टीमचे शेअरर्स खरेदी करण्याचा त्याचा विचार आहे.
सलमान खान याने उद्योगपती नेस वाडियासोबत आयपीएल संदर्भात चर्चा केली होती. ही चर्चा मुंबईमध्ये लिटिल हार्ट मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविल्यावर झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान मॅरेथॉनचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सलमानला नेस वाडियाशी चर्चा करताना पाहिले होते.

विशेष म्हणजे बॉलिवुड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया आयपीएल फ्रेंचायढी किंग्ज इलेवन पंजाबचे सह मालक आहेत. सलमानला क्रिकेटमध्ये रूची आहे. त्यामुळे तो आयपीएल नियम समजून घेण्यात आणि त्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 14, 2014, 17:32


comments powered by Disqus