महेंद्रसिंग धोनीने दत्तक घेतले ‘पपी’ , After tiger, MS Dhoni now adopts a pup

महेंद्रसिंग धोनीने दत्तक घेतले ‘पपी’

महेंद्रसिंग धोनीने दत्तक घेतले ‘पपी’
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली

टीम इंडियाचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेत राहतो. पण ही चर्चा चांगल्या कारणासाठी आहे. धोनीला प्राण्यांविषयी खूप आपुलकी आहे. ते त्यांने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांने आधी वाघ दत्तक घेतला होता. आता तर भटके जखमी कुत्र्याचे पिल्लू (पपी) दत्तक घेतलेय.

धोनी याने म्हैसूर येथून नऊ वर्षांचा वाघ दत्तक घेतला आहे. धोनीला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. ही आवड त्यांने काय जोपासली आहे. त्याने कुत्र्याचे पिल्लू दत्तक घेऊन पुन्हा एकदा ते दाखवून दिले आहे की, प्राण्यांबद्दलची आपुलकी.
रांची येथील ‘होप ऑन्ड ऑनिमल ट्रस्ट’मधून रस्ता दुर्घटनेतून वाचलेले कुत्र्याचे पिल्लू माहीने दत्तक घेतले आहे. माही ज्याप्रमाणे खेळात सर्वांना समजून घेतो, त्याचप्रमाणे त्याला प्राण्यांविषयी भूतदया देखील आहे. हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.


२०११मध्ये म्हैसूर येथील चमा राजेंद्र प्राणीसंग्रहालयातून वाघ दत्तक घेतला. त्याचे बारसेही त्यांने केले. त्याचे नाव ‘अगस्त्य’ असे ठेवले आहे. आता माहीने रांची येथील प्राणी संग्राहलयातून घेतलेल्या कुत्राचे नाव ‘लिया’ असे ठेवले आहे. माही त्याला इंग्रजीत ‘ली’ तर हिदींत ‘लिया’ अशी हाक मारणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 3, 2013, 10:57


comments powered by Disqus