Last Updated: Friday, November 16, 2012, 15:25
www.24taas.com, अहमदाबाद अहमदाबाद टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या चेतेश्वर पुजारानं डबल सेंच्युरी ठोकून धमाल उडवून दिलीय. पुजाराच्या २०६ रन्सच्या साथीनं भारतानं आपला डाव ८ बाद ५२१ रन्सवर घोषित केलाय.
चार मॅचच्या साखळीतील पहिली टेस्ट अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियममध्ये खेळली जातेय. आज या टेस्टचा दुसरा दिवस. भारतीय क्रिकेट टीमनं इंग्लंड विरुद्ध ब्रेकपर्यंत सहा विकेट ५०२ रन्स आपल्या खात्यात जमा केले होते. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं आपल्या धमाकेदार खेळीनं भारतीय क्रिकेट फॅन्सला खूश केलंय. पुजारानं आज आपल्या टेस्ट क्रिकेट कारकिर्दीतील पहिली-वहिली डबल सेंच्युरी ठोकलीय. ३७४ बॉल्समध्ये चेतेश्वर पुजारानं ही डबल सेंच्युरी ठोकली. भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही ४१ वी डबल सेंच्युरी ठरलीय.
चहापानाच्या ब्रेकपर्यंत पुजारानं ३६७ बॉल्समध्ये २१ चौकारांसहीत नाबाद १९६ रन्स केले होते. तर आर. अश्विननं ४५ बॉल्समध्ये दोन चौकारांसाही नाबाद २१ रन्स केले होते. तर युवराज सिंगनं हाफ सेंच्युरी लगावत टेस्टमध्ये दमदार कमबॅक केलंय. युवराज सिंग ७४ रन्सवर आऊट झाला.
चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारतीय टीम अहमदाबाद टेस्ट जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेण्यास उत्सुक आहे. टेस्टच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून कॅप्टन कूल धोनीनं फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वीरेन्द्र सेहवागने शानदार शतक ठोकलं. तब्बल दोन वर्षांनंतर त्याने कसोटी शतक साजरं केलं. पण, सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा निराशा करत तो केवळ १३ धावांवर बाद झाला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडकडून फिरकीपटू ग्रीम स्वानने चारही विकेट घेतल्या. मात्र, तो टीम इंडियाला धावा काढण्यापासून रोखू शकला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी पुजारासोबत युवराजसिंग २४ धावांवर खेळत होता.
First Published: Friday, November 16, 2012, 13:56