Last Updated: Monday, October 21, 2013, 11:28
www.24taas.com , झी मीडिया, कोलकातासचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा क्षण जवळजवळ येऊन ठेपतोय. सचिनची २००वी अखेरची टेस्ट मुंबईत असणार आहे. पण त्याआधी १९९व्या टेस्टचा मान कोलकात्याच्या ईडन गार्डन्सला मिळालाय.
ईडन गार्डन हे सचिनचं आवडतं मैदान आहे. सचिनच्या या १९९व्या आणि ईडनवरच्या शेवटच्या टेस्टसाठी कोलकाता सज्ज झालंय. १० नोव्हेंबर कोलकात्यासाठी अनोखा दिवस असेल, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फेसबुकवर लिहिलंय.
त्याच दिवशी कोलकात्यात १९वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलही होणार आहे. त्यासाठी शाहरूख खान, अमिताभ बच्चन, कमल हासन असे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. हे सेलिब्रिटी कोलकात्यातली टेस्ट मॅच पाहण्यासाठीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान सचिनच्या या कसोटीसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशन विशेष कार्यक्रमाची आखणी करणार आहे, असं जगमोहन दालमिया यांनी म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, October 21, 2013, 10:52