अॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत Ashes Score: Australia vs England- Gabba Test, Day 3

अॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत, विजयाची संधी

अॅशेस  सीरिज : ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत, विजयाची संधी
www.24taas.com, वृत्तसंस्था, ब्रिसबेन

अॅशेस सीरिजमधील ब्रिस्बेन टेस्टमध्ये इंग्लंडला विजयासाठी तब्बल ५३७ रन्सची गरज आहे. तिस-या दिवसअखेर इंग्लंड दोन विकेट्स गमावत २४ रन्सवर खेळत होती. कॅप्टन ऍलिस्टर कूक ११ तर केविन पीटरसन तीन रन्सवर नॉट आऊट आहेत. इंग्लंडने सुरुवातीलाच झटपट दोन विकेट्स गमवल्या.

तत्पूर्वी दुस-या दिवसाच्या नॉट आऊट ६५ रन्सच्या पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्स गमावत ४०१ रन्स केल्यावर इनिंग घोषित केली. कांगारूंकडून डेविड वॉर्नर आणि माइकल क्लार्कने सानदार सेंच्युरी झळकावली. तर ब्रॅड हॅडिनने हाफ सेंच्युरी केली. तर काल मिचेल जॉन्सन (४ बळी) आणि रियान हॅरीस (३ बळी) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अॅशेस सीरिजमधील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव १४६ धावांत गुंडाळून सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. आज काही धावांची भर टाकून डाव घोषित केला.

दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने मजबूत सुरुवात करताना २२ षटकांत बिनबाद ६५ धावा करीत इंग्लंडवर २२४ धावांची आघाडी घेतली होती. सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर ४५, तर ख्रिस रॉर्जस १५ धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या २९५ धावांत गुंडाळणारा इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियावर मोठी आघाडी घेईल, असे वाटत असताना पाहुण्या इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली. हा संघ ५२.४ षटकांत १३६ धावांत तंबूत परतला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 23, 2013, 18:47


comments powered by Disqus