Last Updated: Monday, October 15, 2012, 23:37
www.24taas.com, पुणेसचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारीत ध्रुवतारा या पुस्तकाच्या ऑडीओ स्वरुपातल्या आवृत्तीचं पुण्यात प्रकाशन झालं. क्रिडा पत्रकार संजय दुधाणे लिखीत ध्रुवतारा पुणे ब्लाइंड स्कुलच्या विद्यार्थ्यांना ऑडीओ बुक स्वरुपात आणलं आहे.
तब्बल अडीच तासाच्या या ऑडीओ बुकमध्ये सचिनची महत्त्वाची माहिती, त्याच्या आवडी निवडी सांगण्यात आल्यायत. आज जागतिक अंध दिनाचं औचित्य साधत हे ऑडीओबुक प्रकाशित करण्यात आलं. अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
यावेळी सचिन स्वत: कार्यक्रमाला उपस्थित नसला तरी त्याने खास शुभेच्छा संदेश पाठवला होता.
First Published: Monday, October 15, 2012, 23:37