कांगारूंना इंग्लंडने लोळविले, मालिका खिशात, Australia collapses in 4th Test; England win the Ashes

कांगारूंना इंग्लंडने लोळविले, मालिका खिशात

कांगारूंना इंग्लंडने लोळविले, मालिका खिशात
www.24taas.com, चेस्टर ली स्ट्रीट

अॅशेस मालिकेत कांगारूंना इंग्लंडने धूळ चारत मालिका खिशात टाकण्याचा परक्रम केला आहे. रॉजर्स-वॉर्नर जोडीने शतकी सलामी दिल्यानंतरही वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक मार्याशसमोर (६-५०) ऑस्ट्रेलियन फलंदाज ढेपाळल्यामुळे येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने कांगारूंचा ७४ धावांनी पराभव करत ३-० अशी आघाडी घेतली.

सामन्यात ११ गडी बाद करणार्या स्टुअर्ट ब्रॉडला सामनावीर घोषित करण्यात आले. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २९९ रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ६८.३ ओव्हरमध्ये २२४ रन्समध्येच गारद झाला. पहिल्या डावातील शतकवीर ख्रिस रॉजर्स आणि बेशिस्त वर्तनासाठी शिक्षा ठोठावल्यानंतर संघात परतलेला डावखोरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर या जोडीने ऑस्ट्रेलियाला १०९ धावांची सलामी दिली.

स्वानने रॉजर्सला ४९ धावांवर ट्रॉटकरवी कॅच आऊट केले. आणि जोडी फोडण्यात यश मिळविले. वॉर्नर-ख्वाजा जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला प्रतिकार केला. परंतु, ख्वाजा (२१) आणि वॉर्नर (७१) रन्स काढून बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजी पुन्हा ढेपाळली. ऑस्ट्रेलिया ३ बाद १६८ अशा स्थितीत असताना ब्रॉडने चेंडू हाती घेतला आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडे मोडून काढले.

ब्रॉडने कर्णधार मायकेल क्लार्कचा (२१) त्रिफळा उडवून मार्गातील अडथळा दूर केला. त्यानंतर ब्रॉडने स्मिथ (२), हॅडिन (४), सिडल (२३), हॅरिस (११) आणि नेथन लायन (८) यांना आऊट केले. वॉटसनला २ रन्सवर बाद करणार्या ब्रेसननने (२-३६) आणि ग्रॅमी स्वान (२-५३) यांनी ब्रॉडला चांगली साथ दिली.

इंग्लंडने कालच्या ५ बाद २३४ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. संघाची धावसंख्या २५१ झाली असताना हॅरिसने नव्या चेंडूवर शतकवीर इयान बेलचा त्रिफळा उडविला. बेलने २१० चेंडूंचा सामना करून ११ चौकारांसह ११३ रन्स केल्या. त्यानंतरच्या दुसर्या)च चेंडूवर हॅरिसने मॅट प्रायरला बोल्ड केले. ब्रॉड १३ धावांवर असताना स्मिथकडे झेल देण्यास भाग पाडले. नाबाद असलेला ब्रेसनन आणि स्वान यांनी ९ व्या गड्यासाठी मौल्यवान ४२ रन्स केल्या.

ब्रेसनन ४५ रन्सवर असताना हॅरिसने आपल्याच गोलंदाजीत त्याचा झेल टिपला. लायनने ऍण्डरसनला शून्यावर बाद करून इंग्लंडचा डाव ३३० रन्सवर संपुष्टात आणला. हॅरिसने ११७ धावांत ७ गडी बाद करून कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, August 13, 2013, 08:47


comments powered by Disqus