ऑस्ट्रेलियाने जिंकला वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप Australia wins Women`s cricket world cup

ऑस्ट्रेलियाने जिंकला वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप

ऑस्ट्रेलियाने जिंकला वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप
www.24taas.com,

ऑस्ट्रेलियनं महिला टीमनं वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. फायनलमध्ये कांगारुंनी वेस्ट इंडिजवर 114 रन्सने मात करत तब्बल सहाव्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याची किमया साधली.

जेसिका कॅमरॉन कांगारुंच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिनं 75 रन्सची शानदार इनिंग खेळली. तर हायनेसनही 52 रन्सची महत्वपूर्ण इनिंग खेळत तिला चांगली साथ दिली. बॉलिंगमध्ये लिसा स्थळेकर आणि पेरीनं विंडीज टीमला चांगलाच दणका दिला. आणि कांगारुंना वर्ल्ड कप जिंकून देण्यात या बॉलर्सनी निर्णायक भूमिका बजावली.

ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं 260 रन्सचं आव्हान विंडीज टीमला पर करता आलं नाही. त्यांची संपुर्ण टीम 145 रन्सवरच ऑल आऊट झाली.

First Published: Sunday, February 17, 2013, 22:47


comments powered by Disqus