Last Updated: Wednesday, October 10, 2012, 20:02
www.24taas.com, मुंबईमॅच फिक्सिंगमध्ये सहा अंपायर्सना निलंबित केलंय. महत्वाचं म्हणजे क्रिकेटला बदनाम करण्यात पुन्हा एकदा पाकिस्तानी अम्पायर्स आहेत. क्रिकेटला सर्वात जास्त बदनाम करण्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू आघाडीवर राहिलेत. मात्र, आता पाकिस्तानी अम्पायर्सही यात मागे नाहीत. क्रिकेटच्या या बॅड बॉईजमुळेच क्रिकेट वारंवार कलंकीत होतं आलंय.
मॅच फिक्सिंग, बॉल टॅम्परिंग आणि डोपिंग या साऱ्या वादांमध्ये नेहमीच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची नावं आघाडीवर असतात. क्रिकेटला सगळ्यात जास्त बट्टा लावला तो याच पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी...
स्पॉट फिक्सिंगस्पॉट फिक्सिंगमध्ये सलामन बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमीर या क्रिकेटपटू असल्याचा खुलासा न्यूज ऑफ द वर्ल्ड या ब्रिटिश टॅबलॉईडनं केला. यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ माजली. बुकी मजहर माजीदकडून इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंगसाठी पैसे घेतल्याचे आरोप सिद्ध झाले आणि यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्याचप्रमाणे त्यांच्यावर आयसीसीनं बंदीही घातली होती.
बॉल टॅम्पिरिंग पाकिस्तानचा माजी कॅप्टन इंझमाम उल हकवर बॉल टॅम्पिरिंगचे आरोप लागले होते. २००६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट लढतीत अंपायर्सनी त्याच्याकडून बॉल हिरावून घेत बॉल बदलला होता आणि पाक टीमला पाच रन्सची पेनल्टीही लावली होती. यानंतर इंझमामनं मैदानावर परतण्यात नकार दर्शवला होता. पाकच्या या आडमुठेपणामुळे इंग्लंडला विजयी घोषीत करण्यात आलं होतं. इंझमामनं यावर अंपाय़र हेयर यांनी मला न सांगताच करावाई केल्याचं कारण पुढे केलं होतं.
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू बूम बूम शाहीद आफ्रिदीनही असाच प्रकार केला होता. त्यानं २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये बॉल कुरतडला होता. त्याचा हा प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला होता. या प्रकारानंतर बॉल बदलण्यात आला होता. आफ्रिदी अशाच अनेक वादांमध्ये अडकला आहे. 2000 साली आफ्रिदीचं नाव सेक्स स्कँडलमध्येही आलं होतं. सिंगापूरमध्ये होणाऱ्या सीरिजसाठी रवाना होण्यापूर्वी आफ्रिदीला काही महिलांबरोबर हॉटेलमध्ये पकडण्यात आलं होतं. आफ्रिदीनं या प्रकरणातून पळ काढण्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाला मी त्या महिलांना ऑटोग्राफ देत असल्याचं कारण सांगितलं होतं. मात्र, पाक बोर्डानं त्याला धुडकावून लावत आफ्रिदीवर दंड ठोठावला होता. त्याचप्रमाणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून त्याला वगळलंही होतं.
डोपिंगमध्ये शोएब आपल्य़ा तेज तर्रार बॉलिंगमुळे ज्या स्पीडनं शोएब अख्तर क्रिकेटविश्वात लोकप्रिय झाला. त्याच रॅपिड फायर स्पीडनं डोपिंगपासून ते पार्ट्यांमधील वादांमुळे तो बदनाम झाला. १६ ऑक्टोबर २००६ मध्ये डोप टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळल्यानंतर पाक बोर्डानं त्याला आणि मोहम्मद आसिफला निलंबित केलं होतं. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतांना त्याला मुलींबरोबर पार्टी करतानाही पकडलं होतं. पार्टीच्या दुसऱ्याच दिवश पाकिस्तानची मॅच होती आणि या मॅचसाठी त्याला अनफिट घोषीत केलं होतं.
स्ट्रिप क्लबमध्ये मुश्ताकला मारहाण१९९८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताक आणि वसिम अक्रमला स्ट्रिप क्लबबाहेर बाचाबाची करतांना पकडलं होतं. दारु प्यायल्यानंतर या दोघांनी तिथे धुडगूस घातल्याचं स्पष्ट झालं होतं.
वादग्रस्त पाकिस्तानी अंपायरपाकिस्तानच्या शकूर राणा यांचं नाव क्रिकेट वर्ल्डमध्ये सर्वात वादग्रस्त अंपायर्समध्ये आघाडीवर आहे. १९८७ मध्ये इंग्लंडविरुद्धची फैसलाबाद टेस्ट राणाच्या अंपायरिंग करिअरमधील सर्वात वादग्रस टेस्ट ठरली होती. इंग्लिश टीमच्या बॉलरचा एक बॉल डेड दिल्यानंतर कॅप्टन गॅटिंग आणि राणा यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या वादानंतर गॅटिंगला राणांची माफीही मागावी लागली होती. तर पाकचे आणखी एक अंपायर असद रौफ यांचं सेक्स स्कँडलमध्ये नाव समोर आलं होतं. रौफ आणि मॉडेल लीना कपूर यांचे फोटो समोर आल्यानंतर क्रिकेटला आणखी एकदा धक्का बसला. या आणि यासारख्या अनेक प्रकरणांत पाक क्रिकेटपटूंमुळे क्रिकेटला कलंक लागला असचं म्हणाव लागेल.
First Published: Wednesday, October 10, 2012, 20:02