Last Updated: Tuesday, March 4, 2014, 21:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपाकिस्तानच्या बुमबुम आफ्रिदीने बांगलादेश विरोधात लगोपाठ षटकारांचा पाढा सुरूच ठेवल्याने, बांगलादेशी फॅन्स कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
आफ्रिदीने १८ चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि बांगला देश फॅन्सचे चेहरे उतरले.
या दरम्यान बांगलादेशचा कर्णधार मुशफीकर रहिमने आफ्रिदीचा झेल सोडला आणि स्टेडियममध्ये बसलेल्या बांगला देशच्या महिला फॅन्स ढसाढसा रडल्या.
ही दृश्य वाहिनीवर पुन्हा पुन्हा दाखवली जात होती. मात्र थोड्याच वेळात शाहिद आफ्रिदीची विकेट पडली आणि बांगलादेशी बालांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आलं, आणि उड्याही मारल्या. मात्र बांगलादेशच्या हातात पराभवचं लागला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 4, 2014, 21:28